"मिलिंदपनहो" म्हणजेच" मिलिंद प्रश्न" हा ग्रंथ बाबासाहेबांचा आवडता ग्रंथ आहे, हा ग्रंथ आपण सर्वांच्या संग्रही असायला पाहिजे. सदर ग्रंथामध्ये पुनर्जन्म या बाबी दिसतात, परंतु तत्कालीन परिस्थिती आणि बौद्ध साहित्यामध्ये झालेली भेसळ समजून घेता ग्रंथ जिज्ञासू पाने वाचल्यास जीवनाचा सार कळून येण्यास वेळ लागणार नाही. सदर ग्रंथामधील काही निवडक भाग असाच लेखाच्या स्वरुपात तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करेन.
बुद्ध साहित्यामध्ये तिपिटकांना अनन्य साधारण महत्त्व आहे, पण त्या साहित्या पलीकडल्या बुद्धविचाराचे सोदाहरण, उपमा आणि दाखल्यांच्या मदतीने विश्लेषण आणि विवेचन करण्याचे महत्कार्य ‘मिलिंद प्रश्न’ हा ग्रंथ करतो. थेट प्रश्न आणि त्यांना सार्थ आणि समर्थ उत्तरं असं त्याचं स्वरूप आहे. प्रश्नांच्या उत्तरांमधून आयुष्मान नागसेनचे बुद्धविचारांचे आकलन किती विलक्षण होते हे जाणवते. त्याप्रमाणे विचारातील स्पष्टता आणि उत्तरं मांडतानाचे त्यांचा अभ्यास आणि धरिष्ठ केवळ अचंबित करणारे नसून अफाट असेच होते. याच ग्रंथामधील "नागसेन आयुष्मान रोहनची भेट" या भागातील काही भाग वाचकांसाठी देत आहे, सदर भाग आपणास व इतरांस एखादा बौद्ध भिक्षु नजरेस पडल्यावर पडणाऱ्या प्रश्नावर प्रकाश टाकतो.
आयुष्मान रोहन स्थविर भिक्षाटनासाठी एके ठिकाणी गेले असता सोनोत्तर ब्राह्मणाचा मुलगा नागसेन (पुढे हे भन्ते नागसेन स्थविर झाले, आणि मिलिंद राजाला अनुत्तरीत केले ) भन्ते रोहन यांना पीत वस्त्रा मध्ये मुंडण केलेले पाहून प्रश्न विचारतो कि, हे महाशय, आपण इतर लोकांप्रमाणे डोक्यावर केस का ठेवीत नाही, त्यावर स्थविर नागसेन यांनी उत्तर दिले, "दुष्ट कृत्यांचा डाग समाजातून काढण्यासाठी उच्च प्रतीचे जीवन जगात असता त्यात सोळा दोष आड येतात. हे जाणून भिक्षु डोक्याचे आणि दाढीचे केस काढीत असतात."
"ते सोळा दोष कोणते बरे ?" बाळ नागसेन ने पुन्हा प्रश्न केला.
रोहन म्हणाले, "केस आणि दाढी ठेवल्याने १) वेळोवेळी सावरावे लागतात २) शृंगरावे लागतात ३) तेल लावावे लागते ४) केस धुवावे लागतात ५) पुष्पमाळ बांधावी लागते ६) अत्तर लावावे लागते ७) सुगंधित ठेवावे लागते ८) हिरडा वापरावा लागतो ९) आवळ्याचे तेल लावावे लागते १०) रंगवावे लागतात ११) बांधावे लागतात १२) कंगीने विंचरावे लागते १३) वेळोवेळी न्हाव्यास बोलवावे लागते १४) केस मोकळे करावे लागतात १५) केसात उवा पडतात १६) जेव्हा केस झडू लागतात, तेव्हा लोकांना तो छळ वाटतो, त्यामुळे ते दुख्खी होतात, पश्छ्ताप करतात, मोहाच्या जाळ्यात सापडतात. त्यामुळे या १६ बाधा आड आल्या कि मनुष्याला कुशल गोष्टीचे विस्मरण होण्याची संभावना असते.
नागसेन ने पुन्हा भन्ते रोहन स्थविर यांना विचारले,
"मग आपले वस्त्र देखील इतर लोकांच्या वस्त्रसमान नाहीत, हे का ?
भन्ते रोहन स्थविर यांनी प्रश्नाचे उत्तर दिले,
"गृहस्थाच्या सुंदर वस्त्रात सुप्त अश्या पाच लालसा असतात. त्यामुळे भयानक धोका उद्भवण्याची शक्यता असते मात्र कषाय वस्त्र धारण करणारास त्यांचा संपर्क हि नसतो, म्हणूनच माझी वस्त्रे इतर लोकांच्या वस्त्राहून अगदी वेगळी आहेत.
जिज्ञासू बाळ नागसेनला त्याचा मार्ग भेटला होता, त्याला कळले होते कि या भिक्षुकडे अफाट ज्ञान आहे, आणि ते आपणहि जाणून घेतले पाहिजे, रोहन स्थाविराना तशी विचारणा केल्यावर, आई वडिलांच्या सामन्तीने बाळ नागसेन प्रव्रजित होऊन श्रामणेर झाला. नागसेन पुढे भन्ते नागसेन स्थविर होऊन अतिशय हुशार आणि बुद्धिमान असा ग्रीक राजा मिलिंद यास प्रश्नोत्तरात हरवतात, प्रश्नोत्तरात हरलेला मिलिंद राजा जीवनाचा सार समजून घेतो आणि बौद्ध धम्मास शरण येतो,
संदर्भ -
मिलिंद प्रश्न, सुगत प्रकाशन
अभिधम्म पिटक - भन्ते तीस्स्वंश
0 comments:
Post a Comment