Twitter Facebook Delicious Digg Stumbleupon Favorites More

Wednesday 1 February 2012

मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातील काठी आहे

मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातील काठी आहे.

सदगृहस्थ हो!

हिँदू समाजातील पांढरपेशे लोक आणि विशेषत: ब्राह्मण लोक यांनी आपल्या देश बांधवांना धर्माच्या नावाने आपल्या पायाखाली चेपून ठेवले व हेच लोक हिँदू, मुसलमान आणि इंग्रज राज्यकर्त्याँ चे पाय चाटून ऐषारामी जीवन जगत आले. याच लोकांनी स्वार्थाँधपणे आपल्या धर्मबांधवाना व देशबांधवांना परक्याच्या व स्वत:च्या गुलामगिरीत डांबून ठेवले व ही गुलामगिरी त्यांनीच पाचशे वर्षे टिकवून ठेवली आणि आता हेच लोक राजकीय गुलामगिरी विरुध्द बकवा करीत आहेत. हेच लोक काँग्रेसच्या झेँड्याखाली जमा होऊन राजकीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देहदंड सोसण्यास तयार आहेत. हेच लोक अस्पृश्यांना सामाजिक व धार्मिक समता देण्यास तयार नाहीत. या लोकांनी संपूर्ण देशाचा व जनतेचा सर्वतोपरीने सत्यानाश केला आहे.

तुम्हाला धार्मिक हक्क नाहीत, ब्राह्मणां पेक्षा तुम्ही नीच आहात असे त्यांच्या जातभाईँनी पुराणादी धर्मशास्रांत लिहून, त्याची अंमलबजावणी राज्यकर्त्याँ कडून करविली. आता ते म्हणतात, "देशाभिमान हा फक्त ब्राह्मणांचाच सदगुण आहे. म्हणून ब्राह्मण लोक देशासाठी तुरुंगवास, देहदंड व सुळावरची शिक्षा सोसत आलेले आहेत." ब्राह्मणेतर व अस्पृश्य शिक्षा सहन करण्यास पुढे येऊ लागले तर हेच ब्राह्मण लोक म्हणतील "तुम्हाला राजकारण समजत नाही."

सरकारी नोकय्रांतील बहुतेक सर्व मोक्याची ठिकाणे ब्राह्मणेतर व अस्पृश्य हस्तगत करण्याची तयारी करु लागले, की हे ब्राह्मण म्हणतील, की या जागा भूषविण्यास तुम्ही लायक (एफिशिअंट) नाही. सांगण्याचा हेतू असा, की धर्म, राजकारण, इ. गोष्टीँतही आम्हीच काय ते श्रेष्ठ व बाकीचे सर्व कनिष्ठ असे समजून अतापर्यँत ब्राह्मण वागत आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यात मानसिक माजोरीपण आणि बौध्दिक व्यभिचारीपणा आलेला आहे. ब्राह्मणेतर समाज व अस्पृश्य समाज हे आतापर्यँत ब्राह्मणांच्या या मानसिक माजोरीपणाला व बौध्दिक व्यभिचाराला भिऊन, त्यांचे गुलाम म्हणून गुपचूपणे वागत आलेले आहेत. परंतू या दोन्ही समाजांना आपली चूक कळून आलेली आहे आणि हे दोन्ही समाज एकत्र होऊन जर आत्मप्रगतीची चळवळ चालवतील, तर ते या पांढरपेशा समाजाच्या गुलामगिरीतून लवकरच मुक्त होतील.

तुम्ही कोणाचीही गुलामगिरी मानू नका. मी मनाने व बुध्दीने ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आहे. मी त्या जातीचे बारसे जेवून बसलेलो आहे. ही जात सर्वत्र आपले वर्चस्व राहावे म्हणून जनतेची नेहमी दिशाभूल करीत असते. तिच्या बौध्दिक लबाड्या चव्हाट्यावर मांडून, अस्पृश्यांना या लोकांपासून दूर ठेवणे हे मी माझे कर्तव्य समजतो. कारण, मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातील काठी आहेँ या काठीच्या आधारे माझी जनता प्रगतीची वाट चालू लागली, तर ती सोमणां सारख्या भोँदू व भेदक लोकांनी तयार केलेल्या खडड्यात पडणार नाही.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
(संदर्भ - मे 1926 सातारा जिल्हा महापरिषद अधिवेशन मधील अध्यक्षिय भाषण)
Share:

0 comments:

Post a Comment

Popular Posts

Copyright © Buddha and His Dhamma | Powered by Blogger
Design by SimpleWpThemes | Blogger Theme by NewBloggerThemes.com & Distributed By Protemplateslab